ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचा कार अपघातात मृत्यू?

Bhairav Diwase
तीन दिवसांनी सुटला वास.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक बिबट मृतावस्थेत आढळून आला असून मोहर्ली-पद्मापूर मार्गाच्या बाजूला कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 
        
       रविवारी ज्या ठिकाणी भरधाव कारने झाडाला धडक दिली. त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर 5 ते 6 वर्षे वयाचा मृत बिबट आढळून आला. 3 दिवसांनी या भागात दुर्गंधी पसरल्यावर बिबट मेल्याचा सुगावा मिळाला. यावरून याच कारच्या धडकेत सदर बिबट ठार झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.  वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मोहूर्ली मार्गावर मद्यधुंद पर्यटकांच्या वाहनांचा अतिवेग वनविभागासाठी चिंतेची बाब बनली आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.