Top News

अस्वलाच्या हल्ल्यात पाच पोलिस जवान जखमी.


Bhairav Diwase.       March 25, 2021
कुरखेडा:- गडचिरोली पोलिस विभागाच्या सी-६० दलाचे जवान बुधवारी (ता. २४) सकाळी कुरखेडा तालुक्‍यातील टिपागड पहाडीवर नक्षलविरोधी शोध अभियान राबवीत असताना अचानक पहाडीवरील अस्वलांनी हल्ला केल्याने पाच जवान जखमी झालेत.

सी-६० दलाचे जवान बुधवारी टिपागड पहाडीवर नक्षलविरोधी शोध अभियान राबवीत होते. त्याच वेळी झुडुपात लपून बसलेल्या अस्वलांनी दोन जवानांवर हल्ला चढविला. या झटापटीत जवानांना वाचविण्यासाठी गेलेल्या तीन जवानांवरही हे अस्वल हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होते. पण जवानांनी हा हल्ला परतवून लावला व अस्वलांना पिटाळून लावले. यात एकूण पाच जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

सुधीर रंधये, ईश्‍वर मडावी, महेश कुडावले, कपिल जाधव व लोमेश करंगले असे जखमी जवानांची नावे आहेत.सुधीर, ईश्वर आणि महेश या तीन जखमी जवानांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एका जवानाच्या पायाला अस्वलाची नखे टोचली असून इतर दोघे झटापटीत खाली पडल्यामुळे त्यांना केवळ खरचटले आहे. कपिल जाधव व लोमेश करंगले या जवानांना कोणतीही जखम झाली नसल्यामुळे मालेवाडा येथेच ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने