Top News

पाच नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर. #Chandrapur #nagarpanchayat

सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवतीचा समावेश.
चंद्रपूर:- विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन नागपूर यांच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतीम आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
सावली नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1 व 15, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 16 व 17, अनुसूचित जमातीकरीता 0 तर अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 5, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3 व 10, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,8,12,13 व 14 तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 6, 7,9 व 11 जाहीर करण्यात आले आहे.
पोंभूर्णा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1 तर अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 3 व 15, अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 10 तर अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4 व 17 तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 8 व 11, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 5,7,13 व 14, सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 2, 6, 9, 12, 16 जाहीर करण्यात आले आहे.
कोरपना नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 16, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 11 , अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 10 तर अनुसूचित जमाती(स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 13 व 14. नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2 , नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 1 व 17, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 3,4,5,7 व 9 तर सर्वसाधारण (स्त्री)करिता प्रभाग क्रमांक 6,8,12, व 15 जाहीर करण्यात आले आहे.
गोंडपिपरी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 14 तर अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 9 व 13, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 15, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 6 व 11, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1,3,5,7 व 17 तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 8,10, 12 व 16 जाहीर करण्यात आले आहे.
जिवती नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जाती (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 0, अनुसूचित जमातीकरीता प्रभाग क्रमांक 10, अनुसूचित जमाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 12 व 16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 13 व 14, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 7 व 15, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 3,5,6 व 9 तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 2,4,8,11 व 17 जाहीर करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने