Top News

देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसनिमित्त ४०० रक्तदात्यांचे अमरावतीला महादान. #Chandrapur #ghuggus #Blooddonation


कठीण काळातील अमूल्य योगदानासाठी Thank You घुग्घुस! - डॉ. आगरकर.
चंद्रपूर:- भाजपचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस जिल्हाभरात भव्य रक्तदान व सेवा शिबीरांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या १७५३ रक्तदात्यांनी रविवारी रक्तदान केले.
यामध्ये गेल्या सतरा वर्षापासुन रक्तदानाची अविरत परंपरा चालवणार्‍या घुग्घुस येथिल देवराव दादा भोंगळे मित्रपरिवाराने जिल्ह्यातील आजवरचे एकदिवसीय सर्वाधिक रक्तदान करण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या रक्तदानात शिबिरात घुग्घुसमधिल १०१९ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला.
स्थानिक गांधी चौकात सकाळी नऊ वाजतापासून रात्री नऊ वाजेपर्यंत रक्तदात्यांच्या गर्दिने परिसर गजबजून गेले होते. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी हजाराच्या संख्येत रक्तदान होण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
येथे झालेल्या एकूण रक्तदानापैकी ४०० रक्तपिशव्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात आल्या.
डॉ. उमेश आगरकर म्हणतात...
(जनसंपर्क अधिकारी, जि. सा. रुग्णालय रक्तपेढी अमरावती.)

लोकनेते आ. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून मानवतावादी कार्यासाठी नेहमी अग्रणी असणार्‍या देवराव दादा मित्रपरिवार घुग्घुस टीमचे कठिण काळातील अमूल्य मदतीसाठी मी आभार मानतो, कौतुक करतो. कोविडमुळे रक्ताचा तुटवडा होताच, शिवाय आमच्या अमरावतीमध्ये हिंदू-मुस्लीम दंग्यामुळे कर्फ्यू लागले. त्यामुळे आमचे अनेक शिबीर रद्द झाल्याने रक्तसाठा अपुरा पडत चालला होता. अशा परिस्थितीत आम्ही रक्तासाठी अनेक जागी पायपीट केली. परंतू जिल्ह्यामध्ये मेळघाटसारख्या आदिवासी भागातील कुपोषित, सिकलसेलग्रस्त अशा अनेक रुग्णांना रक्ताची अधिक गरज होतीच, त्यामुळे आम्ही चंद्रपुरात डॉ. हजारे यांचेशी संपर्क करून दादांच्या शिबिराचे निमंत्रण स्विकारले. आणि इथे येऊन आम्हाला ४०० रक्तपिशव्या मिळाल्या, याचे खरंच आनंद आहे. याशिवाय आयोजकांबरोबरच घुग्घुसमधिल प्रत्येक रक्तदात्याची रक्तदानाबद्दलची जागरुकता व समर्पणवृती आम्हाला यानिमित्ताने पाहायला मिळाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने