देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन वैद्यकीय शिबीर संपन्न. #Pombhurna


पोंभूर्णा:- भाजपा (ग्रामीण)चे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जि. प.सदस्य देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभूर्णा तालुक्यात दिनांक २० व २१ नोव्हेंबर, सलग दोन दिवस दोन वैद्यकीय शिबीर संपन्न झाले. दोन दिवस पोंभूर्णा भाजपातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. एकंदरीत दोन्ही शिबीरे यशस्वी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
२० नोव्हेंबर रोजी मोफत डोळे तपासणी शिबिर व कृत्रिम भिंगारोपन मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबीराला चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. यात एकुण ३७१ रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्याच दिवशी (२०नोव्हेंबर)शस्त्रक्रियेसाठी १९१ रूग्ण पाठविण्यात आले असून उर्वरित दिनांक २३ व २५ नोव्हेंबरला पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दिनांक २१ नोव्हेंबर वाढदिवसाच्या दिवशी मौजा जुनगांव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यातही रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद देऊन हा शिबीर यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावला. यात एकुण ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायीत्व निभावले. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. 
यावेळी भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत