Top News

होय..! "आम्ही पुन्हा येणार" चंद्रपूर शहराचा विकास करायला #Chandrapur #pressconference

महापौर राखी कंचर्लावार यांची पत्रकार परिषद

चंद्रपूर:- शहर महानगरपालिकेत मागील ५ वर्षांपासून ३० एप्रिल २०१७ ते २९ एप्रिल २०२२ पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. लोकनेते माजी वन व अर्थमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आशीर्वादाने या शहराच्या सेवेची संधी मिळाली. गत ५ वर्षात चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यात यश आले, अशी माहिती महापौर महापौर राखी कंचर्लावार यांनी आज 26 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत हॉटेल एनडी येथे दिली.

एप्रिल २०१७ ते एप्रिल २०२२ या काळात मनपा निधी, नागरी दलित सुधार योजना, नगरोत्थान निधी, पायाभूत सुविधांचा विकास निधी व इतर निधी अंतर्गत विविध रस्ते विकासकामे यासाठी १९० कोटी ६८ लाख ९६ हजार ३१८ रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीतून कोनेरी स्टेडियम नूतनीकरण, बाबुपेठ येथील स्टेडियम बांधकाम, महाकाली मंदिर प्रभागात झरपट नदीचे सौदर्यीकरण करण्यात आले.

यावेळी पत्रकार परिषदेत उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, माजी महापौर अंजली घोटेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सभागृह नेता देवानंद वाढई, गटनेत्या जयश्री जुमडे, नगरसेवक अनिल फुलझेले, नगरसेवक संजय कंचर्लावार, भाजपचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांची उपस्थिती होती.

विविध रस्ते विकास

एप्रिल २०१७ ते एप्रिल २०२२ या काळात मनपा निधी, नागरी दलित सुधार योजना, नगरोत्थान निधी, पायाभूत सुविधांचा विकास निधी व इतर निधीअंतर्गत विविध रस्ते विकासकामे यासाठी ६६ नगरसेवकाच्या प्रभागात १ हजार ९८७ विकासकामे करण्यात आली. त्यासाठी १९० कोटी ६८ लाख ९६ हजार ३१८ इतक्या निधीतून रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. या निधीतून कोनेरी स्टेडियम नूतनीकरण, बाबुपेठ येथील स्टेडियम बांधकाम, महाकाली मंदिर प्रभागात झरपट नदीचे सौदर्यीकरण करण्यात आले.

अमृत पाणीपुरवठा

केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) पाणीपुरवठा योजनेच्या एकुण १६ टाक्यानुसार झोननिहाय शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी एकुण १० झोन कार्यान्वीत करण्यात आले आहेत. यात झोन क्र. १ (तुकुम), झोन क्र. २ (तुकुम नविन टाकी), झोन क्र . ३ ( शास्त्रीनगर ), झोन क्र. ५ (बंगाली कॅम्प रय्यतवारी), झोन क्र. ६ (नेताजी चौक बाबुपेठ), झोन क्र. ७ (हिग्लाज भवानी मंदिर), झोन क्र. ८ (महाकाली), झोन क्र. ९ (महाकाली जुनी टाकी), झोन क्र. १० (टागोर शाळा), झोन क्र. १६ (वडगाव) कार्यान्वीत करण्यात आले आहे. उर्वरीत झोन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. शहरातील नळ जोडणीबाबत चंद्रपुर शहरामध्येरहिवासी , वाणिज्य व इतर अश्या एकुण ८६,९ ४७ मालमत्तांची नोंद आहे. अस्तित्वातील नळ कनेक्शनची संख्या ३२, २१० आहे. भविष्यामध्ये वाढणाऱ्या मालमत्तांची संख्या लक्षात घेऊन नळ जोडणी देण्याचे काम सुरु आहे. आत्तापावेतो ५९१८७ मालमत्तांना अमृत योजने अंतर्गत नळ जोडणी देण्यात आलेली आहे.

आझाद बगीचा

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. बगिच्यात नेताजी पार्क, स्केटिंग आणि योगा, बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रेन पार्क, ज्योतिबा फुले पार्क, पाथवे, शहीद स्मारक पार्क, फ्लावर गार्डन, गार्डनिंग आणि लॅंडस्कॅपिंग, भव्य मंदिर, आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई, भव्य पार्किंग आणि फूड कोर्ट देखील साकारण्यात आले आहे. आज चंद्रपूर शहरातील नागरिकांना हक्काचे आणि आवडते ठिकाण म्हणून आझाद बगीचा नावारूपास आला आहे.

सुशोभीकरण व सौंदर्यीकरण

ब्लॅक गोल्ड सिटी अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात नागपूर मार्गाने प्रवेश करताच रस्त्याच्या डाव्या बाजूस दृष्टीस पडणारे “आय लव्ह चंद्रपूर” हे आकर्षक भित्तीशिल्प पर्यटकांच्या व शहरातील नागरिकांच्या कुतूहलाचा केंद्रबिंदू आहे. या शिल्पामध्ये चंद्रपूर शहराच्या अन्य वैशिष्ट्यांसह नगरीचे आराध्य दैवत माता महाकाली तसेच यात्रेतील पोतराज यांची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुशोभीकरण व सौंदर्यीकरणकरण्यात येणार आहे. मित्रनगर चौक व हुतात्मा चौकातील सौंदर्यीकरण देखील करण्यात आले. नागपूर रोडवरील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते नागपूर रोडवरील आय लव्ह चंद्रपूरपर्यंत दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबांना वीज दिव्यांची रोषणाई लावण्यात आली.


कोरोना रुग्णसेवा

२२ मार्च २०२० रोजी पहिल्या लॉकडाऊनपासून आजपर्यंत कोरोना रुग्नाची सेवा केली. चंद्रपूर शहर महापालिकेच्या माध्यमातून प्रारंभी उपासमारी होणाऱ्या नागरिकांना जेवणाचे डबे पोहचविण्यात आले. गरिबांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आली. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी विलगीकरण व्यवस्था उभारली. लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी केंद्र सुरु केले वन अकॅडमी, सैनिक स्कुलच्या आणि 'आसरा' कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना एक चांगली कोविड केअर सेंटर सुव्यवस्था निर्माण झाली. महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयोजित लसीकरण बंपर लकी ड्रॉ हा उपक्रम घेण्यात आला. ऑक्टोबर २०२१ मध्ये नवरात्रीनिमित्त महाकाली मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. संभाव्य कोरोना लाट रोखून धरण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत ‘मिशन कवचकुंडल’ अभियान राबविण्यात आले. १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी 'युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण' मोहिम राबविण्यात आली. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा दिव्यांग, वयोवृद्ध व अंथरुणास खिळलेले व्यक्ती यांच्यासाठी "लसीकरण आपल्या दारी" उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मृत व्यक्तीच्या नातलगांना साहाय्य करण्यासाठी आणि सविस्तर माहिती समजावून सांगण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत हेल्पडेस्क स्थापन करण्यात आले.


मालमत्ता करात शास्तीचा लाभ

कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शासनाकडून माहे मार्च २०२० पासून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले. त्या काळात व्यापार व व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग आणि समाजाचे घटक कामगार वर्ग यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे थकीत कराचा भरणा करता आला नाही. अशा घटकांना दिलासा देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात आली. १० जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत २०२२ पर्यंत १०० टक्के, १६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ७५ टक्के, तर १ ते १५ मार्चपर्यंत ५० टक्के सूट देण्यात आली. त्याचा चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

स्वच्छतेत थ्री स्टार मानांकन

चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य दिले. स्वच्छ भारत अभियान - शहरी 2.0 चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'स्वच्छ अमृत महोत्सवा'मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यात कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित केलेल्या 3- तारांकित (थ्री स्टार) मानांकनमध्ये चंद्रपूर शहराचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांना सानुग्राह मदत

कोरोनाच्या महामारीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळांतील ३ विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले. यात दोघांनी आई तर एकाने वडील गमावले. पालकांना गमावलेल्या महानगरपालिकेच्या शाळांतील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये सानुग्राह मदत दिली.

दिव्यांग कल्याण निधी

शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांकरिता दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात दिव्यांगांकरिता निधीची तरतूद करण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या दिव्यांग नागरिकांना मनपातर्फे दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सानुग्रह निधी देण्यात येत आहे. यात २०१८ ते २०२२ या काळात २ कोटी ३२ लाख ६३ हजार २५० इतकी रक्कम आरटीजीएसद्वारे अदा केली आहे. २०२०-२१ मध्ये ८७९ लाभार्थ्यांना ६ लाख ५९ हजार २५० रुपये निधीतून साहित्य किट वाटप करण्यात आली.

गरोदर माता लाभार्थ्यांना अनुदान

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर माता लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येते. ही योजना मे २०१८ पासून सुरु झाली. एप्रिल २०२२ पर्यंत ९ हजार १५५ माता लाभार्थ्यांना ३ कोटी ९७ लाख २३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.

घरकुल योजना


चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत २०१६ पासून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक गरीब कुटूंबाना हक्काचे घर उपलब्ध झाले. २०१७-१८ ते २०२१-२२ या कालावधीत घरकुल निर्माण समितीने ७८८ लाभार्थ्यांच्या घरकुलाला मंजुरी दिली. यातील ४०९ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. १८० घराचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०५९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यातील ९१९ लाभार्थ्यांना हप्ते वितरित करण्यात आले.

सर्व सुविधायुक्त अभ्यासिका

चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी नागपूर मार्गावरील सिव्हिल लाईन्स स्थित हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण करून सौंदर्यीकरण करण्यात आले. तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अभ्यासिका साकारण्यात आली. भानापेठ वॉर्डातील जुन्या वस्तीत नागरिकांच्या सेवेसाठी स्वच्छतागृह होते. मात्र, कालांतराने ते बंद पडले. त्याठिकाणी संत कोलबास्वामी अभ्यासिका आणि अटलबिहारी वाजपेयी अभ्यासिका साकारण्यात आली. बाबूपेठ येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन आणि अभ्यासिका, नागिनबाग येथील प्रज्ञा चौकात संभागृह, जयंत टॉकीज चौकात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पुतळ्याच्या परिसरात नूतनीकरण आदी कामे करण्यात आली.

रेन वॉटर हार्वेस्टिंग

रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकातर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात २ टक्के सूट व रु. ५००० अनुदान देण्याची योजना जाहीर केली.

रेड टँकर

चंद्रपूर शहर महापालिकेच्या माध्यमातून जलप्रदूषण रोखण्यासाठी "माझी वसुंधरा अभियाना" अंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी "रेड टँकर" ही अभिनव योजना अंमलात आणण्यात आली. त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपाच्या कृत्रिम कुंडाचा लाभ घेत ८०६४ गणेश मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरकरित्या केले. तसेच १४३ गणेशभक्तांनी मनपाच्या फिरत्या विसर्जन कुंडाचा लाभ घेतला. दरम्यान, कृत्रिम कुंडात संकलित झालेली माती पुनर्वापरासाठी मूर्तिकारांना परत करण्यात आली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून यंदा पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मनपाच्या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन करणाऱ्या १८०० गणेशभक्तांना जास्वंदाचे रोपटे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरात १०० टक्के पीओपीमुक्त उत्सव साजरा झाला.

विद्युत विभाग

चंद्रपुर शहर महानगरपालिका हद्यीमध्ये ई. ई. एस. एल. मार्फत १६७६४ जुने पारंपारीक पथदिवे बदलवुन १९४६८ नविन एल. ई. डि. पथदिवे लावण्यात आले. चंद्रपुर शहराच्या मुख्य रस्त्यावर (जसे की, नागपुर रोड, बल्लारशाह बासपास रोड, अंचलेश्वर गेट ते बागला चौक, दाताळा रोड) ई. ठिकाणी आधुनिक पध्दतीचे पथदिवे खांब लावण्यात आले. नागपूर रोडवरील प्रियदर्शनी चौक ते गजानन महाराज मंदीर चौकापर्यंत असलेले अस्तित्वातील खांबावर एल. ई. डि. सिरीज लावुन सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीवर उर्जा बचतीचे दृष्टीने ५० किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल लावण्यात आले. विविध प्रभागांमध्ये सन २०१७ पासुन आतापावेतो जवळपास 110 हायमास्ट उभारणीचे काम करण्यात आले.

बाबुपेठ पोलीस बीटसाठी जागा

नेताजी चौक, बाबुपेठ परिसरात प्राणघातक हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. येथे पोलीस बीट सुरु करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करुन देण्यात आली . नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था करीता नेताजी चौक, बाबुपेठ या परिसरात पोलीस बीट सुरु झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने