भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी चंद्रपूर महानगरात #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर महानगरात भाजयुमो युवा वॉरियर्स शाखा फलकाचे शिवानी दाणी यांच्या हस्ते अनावरण
चंद्रपूर:- दिनांक 27/04/2022 रोजी,
भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वामन तूर्के, युवा वॉरियर्स विदर्भ विभाग संयोजक देवदत्त डेहनकर महानगरात संघटनात्मक दौऱ्यावर येत असून माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी ब्रिजभुषण पाझारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर महानगरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखा फलकाचे अनावरण भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांच्या हस्ते होणार आहे.
दि. 27/04/2022 ला सायं. ५ वाजता वि. दा. सावरकर चौक येथे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश महामंत्री शिवाणी दाणी यांच स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर भाजयुमो कडुन बाइक रॅली काढत बंगाली कॅम्प चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखा फलकाचे अनावरण करण्यात येईल. श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालयात युवा वॉरियर्स संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडु, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, यश बांगडे, किष्णा चंदावार, हिमांशू गद्देवार, संजय पटले, गणेश रामगुंडेवार, गजू भोयर, अक्षय शेंडे, सतिश तायडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.
तरी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या तसेच सर्व आघाडी चा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा कडून केले आहे.