पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिंपरी, येथे दिनांक 20 ते 21 एप्रिल 2022 या रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद, बेंगलोर ची पीअर टीम कॉलेजच्या प्रथम मूल्यांकनासाठी आली होती.
दोन दिवसाच्या भेटीत, या NAAC चमू चे अध्यक्ष डॉ. मुस्तफा शहा, समन्वयक डॉ. वेंकटरमन अब्बा राजू तसेच सदस्य डॉ. मुक्तेश कुमार सिंग यांनी कॉलेजचे सर्व शैक्षणिक विभाग, प्रशासनिक विभाग, राष्ट्रीय सेवा विभाग, खेळ मैदान, वनस्पती उद्यान, ग्रंथालय, समाज उपयोगी कामे, संशोधन कार्य, सांस्कृतिक विभाग, शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचे निकाल, मूलभूत सुविधा, संसाधनाची स्थिती, आर्थिक स्थिती, विद्यार्थी सेवा याबद्दल बारकाईने तपासणी केली.
तसेच आजी माजी विद्यार्थी पालक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून दोन दिवसीय अहवाल प्राचार्य कडे सुपूर्त केला. पाच दिवसांनी कॉलेजला सेवन पॉईंट स्केल नुसार संस्थात्मक CGPA श्रेणी 2.78 तर व अक्षरआत्मक श्रेणी B++ मिळाली. या मूल्यांकना मुळे कॉलेजच्या शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेमध्ये प्रगती होणार आहे.
कॉलेजला चांगली श्रेणी मिळाल्याबद्दल संस्थेचे आदरणीय सचिव श्री स्वप्नील दोंतुलवार इतर पदाधिकारी यांनी प्राचार्य डॉक्टर सी. ए निखाडे, IQAC समन्वयक डॉ. संजय सिंग, NAAC समन्वयक डॉ प्रतीक बेझलवार तसेच सर्व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.