Top News

बैल बाजारात केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था #watee

पोंभूर्णा:- उन्हाळा वाढत चालला तसतसे उन्हाचे चटके सुध्दा जाणवायला लागले आहेत. भर दुपारी अंगाची लाहीलाही होत असल्याने पिण्याच्या पाण्याची गरजही तेवढीच वाढत जाते. मौजा घाटकुळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत बैलबाजार भरते.
बैलांच्या देवाणघेवाणीसाठी घाटकुळ बैलबाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात बैलांच्या खरेदी-विक्री साठी पोंभूर्णा, गोंडपिपरी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने येतात. मात्र या बाजारात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागत होती. ही समस्या लक्षात घेऊन माजी उपसभापती विनोद देशमुख यांनी बैलबाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. शेतकऱ्यांतही आनंद पाहायला मिळत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने