उद्घाटन समारंभ तथा श्री गुरुचरित्राच्या पारायणाचा सांगता समारोह #chandrapur
चंद्रपूर:- उद्घाटन समारंभ तथा श्री गुरुचरित्राच्या पारायणाचा सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक आ. सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष विधीमंडळ लोकलेखा समिती, महाराष्ट्र राज्य माजी मंत्री (वित्त, नियोजन व वने), कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. राखीताई कंचर्लावार महापौर. म. न. पा. चंद्रपूर तुकूम प्रभाग क्र. १ येथील नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या समर्पित प्रयत्नाने व आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आशिर्वादाने “अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ बाल संस्कार सभागृहाचे उद्घाटन" तसेच स्वामी पुण्यतिथी निमित्य श्री गुरु चरित्राच्या पारायणाचे सांगता समारंभ होत आहे.
श्री स्वामी समर्थ उद्घाटन समारंभ तथा श्री गुरुचरित्राच्या पारायणाचे सांगता समारोह समारंभात आपण सादर आमंत्रित आहात. गुरुवार, दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता स्थळ:- श्री स्वामी समर्थ शिवनेरी बालोद्यानच्या मागे, तुकूम चंद्रपूर कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसाद नियोजन करण्यात आले आहे.
विनीत.....
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणित) सर्व सेवेकरी तसेच तुकूम प्रभाग क्र . १ मधील जेष्ठ व श्रेष्ठ नागरीक, तुकूम चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत