Top News

पोंभूर्ण्यात भव्य तालूका आरोग्य शिबीर #pombhurna

१०१७ जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत कुटुंबाला ५ लाखाचा विमा; आयुष्यमान गोल्डन मोफत कार्डची नोंदणी
पोंभूर्णा :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात २५ एप्रिलला आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०१७ लोकांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला होता. प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाखाचा विमा व आयुष्यमान गोल्डन मोफत कार्डच्या नोंदणी व सेवाही पुरविण्यात आली.

🎂
कार्यक्रमाचे उद्घाटक पोंभूर्णा नगर पंचायतचे नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांची तर अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक कवडू कुंदावार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर डॉ. हेमचंद कन्नाके, डॉ.कामरान शेख नागपूर,गट विकास अधिकारी धनंजय साळवे, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, नगरसेविका नंदा कोटरंगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदेश मामीडवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिकेत गेडाम, डॉ.वंदना बावणे, डॉ.किशोर वडपल्लीवार, डॉ.नेहा वैद्य, डॉ.श्रावणी खोडेलवार यांची उपस्थिती होती.

🎉
गरीब गरजू कुटुंबातील लोकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाने पोंभूर्णा तालुका आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात एक हजाराहून अधिक जणांनी आरोग्य शिबिराचे लाभ घेतला. यात किडणीचे आजार, मधुमेह,रक्तदाब, हृदयविकार,बाल विकार,नाक कान घसा विकार, क्षयरोग आदी आजारांवर संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी ॲलोपॅथी, होमोपॅथी, आयुर्वेद,आयुष, आदी विभागाच्या डॉक्टरांनी सेवा पुरविल्या.या सोबतच नागपूर व सावंगी मेघे हॉस्पीटलच्या आठ डॉक्टरांच्या चमूंनी इथे वैद्यकीय सेवा दिली.
🎉
आरोग्य शिबिराच्या रूग्णालय परिसरात आरोग्यविषयक जनजागृती स्टॉल लावण्यात आले होते. यात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना,ई-संजीवनी, कुष्ठरोग, हिवताप मलेरीया कक्ष, क्षयरोग, कुटुंब नियोजन,आशा योजना, राष्ट्रीय जंतनाशक मोहिम,लसिकरण कक्ष, मानसिक रोग कक्ष आदींचा समावेश आहे. यावेळी रुग्णांची तपासणी आणि निदान येथे करण्यात आले. त्यानुसार उपचार व आवश्यकता असल्यास संदर्भ सेवा उपलब्ध करून दिल्या गेली. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचा विमा योजना व आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आता मोफतची नोंदणी व सुवीधा पुरविण्यात आली.
🎉
कार्यक्रमाचे संचालन उज्ज्वला गेडाम, प्रास्ताविक डॉ.प्रकाश साठे तर आभार राजेश चांदेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुरज डुकरे,अझहर मलक, मयूर इजगिलवार,प्रशांत शिरके, महेंद्र शेडमाके, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेवीका, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी तसेच चिंतामणी विद्यालयाचे एन.एस.एस. चे विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने