चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील जेटपूरा गेट-रामाळा तलाव मार्गावर असलेल्या एका इमारती वरती युवकाचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:- पेपरला जात असताना दोन मैत्रिणीचा अपघातात मृत्यू
शासकीय इमारतीच्या छतावर युवकाच्या मृतदेह आढळून आला आहे तर मृतदेहाच्या बाजुला दारूच्या बॉटल्स आढळून आल्या आहे.
हेही वाचा:- २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
मारेकऱ्यांनी दारू पिऊन त्या युवकाची हत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मृतदेहाचे हात व पाय सेलो टेप ने चिपकविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पोलीस मृतक युवकाची ओळख पटवीत असून तपास करीत आहे.