चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील नगीना बाग जवळ किरायाने रुम करून असलेल्या युवकांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. १४ जुन ला सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास उघडकिस आली. मृतक युवकाचे नाव सारंग मोरेश्वर येलमुले वय २३ रा. पोळसा ता. गोंडपिपरी येथील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंडपिपरी तालुक्यातील रहिवासी सारंग मोरेश्वर येलमुले यांनी चंद्रपूर शहरातील नगीना बाग जवळ किरायाने रुम करुन राहत होता. सारंग हा स्पर्धापरीक्षेची तयारी करत होता. आज दि. १४ जुन ला सायंकाळी ६ तेे ७ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा:- पेपरला जात असताना दोन मैत्रिणीचा अपघातात मृत्यू
आत्महत्येच कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल होत पंचनामा केला असून शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.