जाहिरात... Advertisement... विज्ञापन

विनामूल्य मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न #sindewahi


नवी दृष्टि देण्याचे समाज कार्य करणारे माजी जि. प. सदस्य रमाकांत लोधे

सिंदेवाही:- तालुक्यातील मौजा- पळसगाव (जाट) येथे भव्य मोतीबिंदू शिबीराचे आयोजित करण्यात आले त्या दरम्यान , दुसऱ्याच्या दुःखांत समरस होवून मदत करण्याची सवेदनशीलता माणुस हरवून बसला आहे.पण समाजातील सेवाभावी वृती अजूनही जीवंत असल्याची प्रचिती माजी जि. प. सदस्य श्री:रमाकांत श्रीधरराव लोधे यांच्या रूपाने येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तथा रक्तदान शिबिरांची एक लोकचळवळ उभी करणारे व्यक्तिमत्व म्हणून माजी जि.प.सदस्य रमाकांत लोधे यांची विशेष अशी ओळख आहे.मागील सातत्याने 15 वर्षापासून अखंडितपणे मोतीबिंदू शिबिरांच्या माध्यमातून 15,000 रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे महान कार्य श्री. रमाकांत लोधे यांनी केली आहे. सिंदेवाही तालुक्यातील मौजा पळसगांव (जाट) येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर,प्राथमिक आरोग्य केन्द्र नवरगांव, ग्राम कांग्रेस कमिटी पळसगांव(जाट), तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही आणि रमाकांत लोधे मित्र परिवाराच्या वतीने दि:12जून 2022 ला भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले.
सदर शिबिरात 515 रूग्णांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली आणि रुग्णांची शस्त्रक्रिये करीता213 रुग्णाची निवड करण्यात आली. आणि पहिल्या टप्प्यात 61 रुग्णना सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले.शिबिराच्या उदघाटन करुण कार्यक्रमाला सुरवात केली. उदघाटन।प्रसंगी या शिबिराच्या कार्यकर्माचे उदघाटक श्री:जयंतजी बोरकर अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ नवरगांव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री:जगदीश कामडी सरपंच ग्राम: पंचायत पळसगांव(जाट) श्री:रमाकांत लोधे माजी जि. प. सदस्य चंद्रपुर,श्री:अशोक संगत पळसगांव, रमेश बोरकर,श्री: निरंजनजी पाकमोड़े माजी सरपंच ,श्री किशोर हटवादे, श्री:रमेश बनकर , अब्दुल हक, श्री:सचिन सहारे,श्री: विजय मुरकुटे उपस्तित होते.या कार्यक्रमाचे संचालन श्री:मंगेश मेश्राम तर प्रस्ताविक श्री:रमाकांत लोधे यांनी केले.शिबिराच्या उभारणी करिता लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत जोशी, सचीव दिलीप चांडक, कार्यवाहक दिनेश बजाज आणि सेवाग्राम नेत्र रुग्णांलयाचे नेत्रतद्य डॉ: अजय शुक्ला ,नेत्र सहायक डॉ:सचिन ताकसांडे आणि चमू यांनी सहकार्य केले सोबतच शिबिराच्या यशस्वीतेकरीता ग्राम कांग्रेस कमिटीचे सदस्य, श्री:अक्षय पेटकुले, मंगेश मेश्राम ग्राम पंचायत सदस्य रत्नापुर, वासुदेव दडमल सदस्य रत्नापुर, ईमरान पठान ,कपिल मेश्राम,माणिक गेडाम,आशीष नागोसे, दिलीप तोनफोड़े ,रंजित मेश्राम,ओमप्रकाश मेश्राम, वामन जीवतोड़े आणि पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत