शिक्षकांच्या आँनलाईन प्रशिक्षणाचा फज्जा #Chandrapur

Bhairav Diwase
0

आँफलाईन प्रशिक्षण देण्यात यावे, भाजप शिक्षक आघाडीची मागणी


चंद्रपूर:- महाराष्ट्रातील वरिष्ठ व निवडश्रेणी पात्र एकूण ९४५४१ शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणे यांच्याकडे प्रशिक्षणा करिता नोंदणी केलेली होती. त्याकरीता प्रती शिक्षकांकडून रुपये २०००/- शुल्क वसुल करुन १८ कोटी ९० लाख ८२ हजार इतकी शुल्काची रक्कम शिक्षण विभागाकडे जमा झालेली आहे. परंतू १ जून २०२२ पासून सुरू असलेल्या आँनलाईन प्रशिक्षणात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला आहे. प्रशिक्षण सुरू होऊन काही तासातच प्रशिक्षणार्थी शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
प्रशिक्षण राबविणारी यंत्रणाच सक्षम नसल्याने समस्या निर्माण झाल्यात. सदर प्रशिक्षण घेणारे हजारो शिक्षक तांत्रिक बाबी मुळे निर्माण झालेल्या अडचणीने वैतागले आहेत. शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. असा आरोप भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉ. कल्पनाताई पांडे, सहसंयोजक डॉ. उल्हास फडके, पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवनकर,भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा संयोजक गुरदास कामडी,प्रा. अरुणराव राहंगडाले, महामंत्री रविंद्र गुरनुले, जिल्हा सहसंयोजक श्रीकांत कुमरे,प्रा.पुजांराम लोडे, दिवाकरराव पुद्दटवार, विनय कावडकर, प्रफुल्ल राजपुरोहीत आदीनी केला आहे.
सेवांतर्गत प्रशिक्षण शिक्षकांना देणे ही शासनाची अत्यावश्यक प्रशासकीय जबाबदारी आहे. आजपर्यंत शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी कधीच प्रशिक्षण शुल्क आकारण्यात आलेले नाही. प्रशिक्षण शुल्क नियमबाह्य रीतीने वसूल करण्यात आलेले आहे. गेल्या सात वर्षापासून प्रशिक्षणा अभावी नोंदणीकृत शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यात आलेली नाही. अनेक शिक्षक या कालावधीत सेवा निवृत्त झालेत, त्यांच्या बाबतीत आता काय निर्णय घेणार?
शिक्षकांचे प्रशिक्षण शुल्क परत करावे. प्रशिक्षणाच्या खेळखंडोबा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण रद्द करून ऑफलाइन प्रशिक्षण देण्यात यावे. सर्व नोंदणीकृत शिक्षकांना विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याच बरोबर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वैयक्तिक व सामुहिक  समस्या बाबत निवेदन सादर करून तात्काळ समस्या मार्गी लावण्यात याव्यात.
जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे. अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ समायोजन करण्यात यावे. दर महिन्याच्या एक तारखेला पगार झालेच पाहिजे. वेतनास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्यात यावे, प्रलंबित वैद्यकीय देयके मंजूर करण्यात यावी... पर्यवेक्षक या पदांना वेतनश्रेणी लागू करावी. प्रलंबित पर्यवेक्षक, मुख्याध्यापक पदांना तात्काळ वैयक्तिक मान्यता देण्यात यावी. आदी मागण्यंचे निवेदन मा. शिक्षणाधिकारी सौ. कल्पताई चव्हाण माध्ममिक ,दीपेंद्र लोखंडे शिक्षधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉ. कल्पनाताई पांडे, सहसंयोजक डॉ. उल्हास फडके, पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवनकर,भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा संयोजक गुरदास कामडी,प्रा. अरुणराव राहंगडाले, महामंत्री रविंद्र गुरनुले, जिल्हा सहसंयोजक श्रीकांत कुमरे,प्रा.पुजांराम लोडे, दिवाकरराव पुद्दटवार, विनय कावडकर, प्रफुल्ल राजपुरोहीत आदीनी  अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)