Top News

ब्रम्हपुरीतील रेल्वे फाटक जवळ गंदगी, गर्दी व गर्मी अश्या तिन्ही "ग" चे सावट...

ब्रम्हपुरीतील रेल्वे फाटक जवळ गंदगी,गर्दी, व गर्मी अश्या तिन्ही "ग" चे सावट...


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- शहरातील रेल्वे फाटक ही समस्या फार मोठी व फार जुनी आहे. गोंदिया ते बल्लारशाह दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या फेऱ्या ब्रह्मपुरी रेल्वे स्थानकावरून दिवसभरच सुरू असतात. त्या कारणाने रेल्वे फाटक वारंवार बंद होणे ही समस्या नेहमीचीच आहे. परंतु सर्वात मोठी समस्या म्हणजे गंदगी ची आहे कारण की गेडाम हॉस्पिटल जवडून येणारे सांडपाणी हे रेल्वे फाटका नजीक असणाऱ्या उजव्या कोपर्‍यावरती नियमितपणे जमा असते.
तसेच त्यासोबत घाण, कचरा सुद्धा असतो त्यामुळे त्याची दुर्गंधीचा रेल्वे स्थानक रेल्वे फाटकाजवळ थांबणाऱ्या प्रवाशांना फार मोठा  सततच त्रास होत असतो. त्यातल्या त्यात नागपूर गडचिरोली हे महामार्ग असल्यामुळे फाटकाजवळ चारचाकी वाहनांची,दु चाकी वाहक धारकांची गर्दी निर्माण होत असते. तसेच सध्याचे उष्णतामान अख्ख्या भारतात ब्रह्मपुरीत टोकावर आहे.
एवढ्या उष्णते मध्ये रेल्वे फाटक बंद असणे, लोकांची गर्दी जमणे, व नजिकच्या गंदगी चा दुर्गंध व प्रचंड उष्णता म्हणजेच गर्मी ह्या तिन्ही भयानक  जिवघेण्या प्रसंगांना तोंड देऊन लोकांना प्रवास करताना होणारा त्रास आहे तो वास्तविक आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकाच्या बाजूला एक मोठा बॅनर लागला होता.
रेल्वे उड्डाण पुलासाठी कोट्यावधी रुपयांची मंजुरी म्हणून काही काँग्रेस कार्यकर्त्यांचे फोटो सुद्धा लावले गेले होते पण त्या ठिकाणी हालचाली काही दिसत नाहीत. हा प्रकार बघून नागरिकांना व प्रवाशांना हाच एक प्रश्न पडतो की,.. गंदगी, गर्मी व गर्दी या  राज्यकर्तेना भारी पडली की काय?ही मंडळी कुठे गायब झालीहे कळायला वाव नाही.  ब्रह्मपुरी तील हे प्रलंबित रेल्वे उड्डाणपूल त्वरित बांधकाम पूर्ण करण्याची संतापजनक मागणी  समस्त ब्रह्मपुरी वासी व प्रवाशांची आहे.  शासनाने याकडे लक्ष द्यावे. व उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण करावे.
शेवटी येणाऱ्या निवडणूकींचा हा मुददा
आहेच.
          -तुलेश्र्वरी बालपांडे ब्रह्मपुरी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने