पोंभुर्णा तालुक्यातील कोणताही नागरिक उपाशी पोटी झोपु नये, म्हणुन स्व खर्चातुन गरजु नागरिकांना मदत.
Bhairav Diwase. April 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोभुर्णा: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहोत. संपूर्ण देशात कोरोना विषाणू चा संसर्ग वाढत आहे त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन मजुरीच्या आधारे कुटुंब जगविणाऱ्या लोकांना जीवन जगतांना खूप अडचणी निर्माण झालेल्या असून, दोन वेळा जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून पोभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे रहिवासी असलेले, मनोज मुलकलवार (मनोज कृषी केंद्र उमरी पोतदार ) यांनी स्व खर्चातुन गरजु नागरिकांना पर्यंत मदत मिळवी. पोंभुर्णा तालुक्यातील कोणताही नागरिक उपाशी पोटी झोपु नये. म्हणून आज तहसिल कार्यालयात जावुन, पोंभुर्णा तालुक्यातील तहसीलदार निलेश खटके साहेब यांच्याकडे 95 किट देण्यात आले. या किट मध्ये तेल, साखर, पती, हळद, तिखट, मीठ, साबन, होते. नायब तहसीलदार यामावार साहेब, कृषी अधिकारी भोयर सर, ढोरे सर, शेंडे सर विस्तार अधिकारी कृषी, पुरवठा निरीक्षक तहसिल पोंभुर्णा, तलाठी चौधरी सर, आत्राम साहेब मंडळ अधिकारी, तसेच चंद्रशेखर झगडकर, लक्ष्मण गव्हारे उपस्थित होते.