अमरावती जिल्ह्यात श्री राम सेना चंद्रपूर युवा अध्यक्ष वैभव एनपल्लीवार यांच्या कडून गरजू लोकांना मदतीचा हात.

Bhairav Diwase
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा जुनी वस्ती येथील नागरिकांना मदत चंद्रपूर श्री राम सेना तर्फे. 
    Bhairav Diwase.    April 12, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. त्यामुळे काही लोक अडचणी आहे. काम करून पोट भरायचे. त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या कडे उपासमारीची वेळ आली होती. अमरावती जिल्ह्यातील राहुल नगरबडनेरा जुनी वस्ती येथील नागरिकांनी खासदार, आमदार यांना मदत मागितली असता. त्यापैकी कुणी पण मदत केली नाही. सोन्या चौधरी, सरस्वतीबाई कांबळे, कविता चौधरी यांच्या मदतीला, वैष्णवी मालवीय,अन्नपूर्णा मालवीय त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.