लाभार्थ्यांना 3 महिन्यांचे अनुदान एकत्रित देण्यात यावे व या गरीब लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली
Bhairav Diwase. April 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या योजनांचे लाभार्थी वृध्द, निराधार, अंध, अपंग, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीता हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असून या लाभार्थ्यांना 3 महिन्यांचे अनुदान एकत्रित देण्यात यावे व या गरीब लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे.
या मागणी संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. पराग जैन व वित्त विभागाचे सचिव श्री. राजीव मित्तल यांच्याशी आज चर्चा केली. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना या योजनांचे महाराष्ट्रात साधारणतः 34 लक्ष लाभधारक आहेत. 18 जून 2019 रोजी या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. 600 रू वरून 1000 रू. तर 2 अपत्ये असणा-या व्यक्तींना 1200 रूपये अशी वाढ या योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. पराग जैन व वित्त विभागाचे सचिव श्री. राजीव मित्तल यांच्याशी चर्चा झाली असून या आठवडयात मार्च, एप्रिल, मे या तिन महिन्यांचे सरासरी प्रत्येकी 1000 रूपये याप्रमाणे तीन महिन्यांचे 3000 रूपये व केंद्र सरकारतर्फे माननीय मोदींजींनी पाठविलेले 1000 रूपये अशा पध्दतीने रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आपण केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे येत्या आठवडयात 3500 रूपये प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे व 500 रूपये मे महिन्यात साधारणतः जमा करण्यात येईल्, असे सांगण्यात आले आहे. जानेवारी पासून इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेचे जे पैसे आहे ते सुध्दा जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.