मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन चंद्रपूर तर्फे कोविड19 (कोरोना) बद्दल जनजागृती.

Bhairav Diwase
सावली,मूल व चंद्रपूर या तालुक्यातील १५० गावांमध्ये कोरोना विषाणू म्हणजेच कोविड १९ या आजारावर विविध माध्यमातून जनजागृती.
Bhairav Diwase.   April 13, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने सावली,मूल व चंद्रपूर या तालुक्यातील १५० गावांमध्ये कोरोना विषाणू म्हणजेच कोविड १९ या आजारावर विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मॅजिक बस या संस्थेच्या माध्यमातून  विविध मार्गांनी जनजागृतीचे कार्य हाती घेण्यात आले त्यामध्ये ऑडिओ, व्हिडीओ, व्यंग चित्र,आणि मोबाईल कॉल यासारख्या अनेक मार्गाने  कोविड १९ या आजारा पासून आपण कस्या पद्धतीने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकतो सोबतच कलम १४४ बद्दल माहिती देऊन लॉकडाऊन चे पालन करणे का गरजेचे आहे यावर जनजागृती करण्यात येत आहे आणि जनजागृती करीत असताना शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून या सर्व पद्धतीने जनजागृती चे कार्य मॅजिक बस ही संस्था करीत आहे.या सर्व  माध्यमातून बऱ्याच लोकांना त्यामध्ये पालक, युवक, युवक मंडळ, महिला मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील मुले यांना याबाबद माहिती देण्यात आली आहे. या सर्वांनी सांगितलेल्या बाबीवर विचार करण्यास सुरुवात केली आणि इतरांना देखील त्याबद्दल सांगितले. हे कार्य करतांना मॅजिक बस चे स्वयंसेवक (CYL) समुदाय संघटक (CC)गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या सहकार्याने हे कार्य करण्यात येत आहे या जनजागृतीच्या कामासाठी  मॅजिक बस चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, तालुका समन्वयक,क्षेत्र अधिकारी, युवा मार्गदर्शक, शाळा साहाय्य अधिकारी यांच्या अथक प्रयत्नामुळे सावली, मूल, आणि चंद्रपूर या तालुक्यातील १५० गावातील लोकांना जनजागृतीचे काम करण्यात आले.