मैढ-क्षत्रिय-सोनार समाज बांधवांचे रक्तदान.

Bhairav Diwase
स्वेच्छा रक्तदानाचा १४ वा दिवस.

आ सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम.
Bhairav Diwase.    April 15, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील आय एम ए सभागृहात मागील १३ दिवसा पासून स ९ ते ११वा दरम्यान स्वेच्छा रक्तदान सुरू आहे. आम सुधीरभाऊ मित्र परिवार तर्फे आयोजित या उपक्रमात आज १५ एप्रिल,बुधवारला मैढ-क्षत्रिय-सोनार समाजाने सहभाग नोंदविला. यावेळी आय एम ए चे अध्यक्ष डॉ किरण देशपांडे,डॉ अनिल माडूरवार,डॉ नरेंद्र कोलते,डॉ मंगेश गुलवाडे,डॉ झेबा निसार आणि मैढ क्षत्रिय सोनार समाजाचे प्रमुख देवेंद्र वर्मा ,प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रामनवमी च्या पर्वावर सुरू झालेला हा उपक्रम विशेषत्वाने जिल्हा सामान्य रुग्नालयातील थायलेसीमिया व सिकलसेल रूग्णांना रक्त पुरवठा व्हावा म्हणून राबविल्या जात आहे.
रक्तदानाच्या १४ व्या दिवशी मैढ क्षत्रिय सोनार समाजच्या बांधवांनी आज बुधवारला रक्तदान केले.यात संजय वर्मा ,रितेश वर्मा,हेमंत बुट्टन,मनोज सोनी,विवेक सोनी,हिरा सोनी,दिलीप सोनी,लवकुश सोनी यांचा समावेश होता.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.संचालन व प्रास्तविक डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले . प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी दत्तप्रसंन्न महादानी, प्रकाश धारणे, सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, राहुल पावडे ,प्रशांत विघ्नेश्वर  परिश्रम घेत आहे. रक्त संकलन च्या कार्यात चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या चमुने महत्वाची भूमिका बजावली.