सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द ना वरात, ना गाजा वाजा, ना फटाके, ना नाचता, फक्त फुलांचे हार कपळाला बांशिग अशा साधा पध्दतीने विवाह संपन्न.

Bhairav Diwase

कोरोना मुळे साध्या पध्दतीने लावले विवाह.
Bhairav Diwase.   April 19, 2020 

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:
लग्न म्हणजे जिवनातील आनदाक्षण. अलीकडे नव्या पिढीत एक आनंद बनला आहे. परंतु कोरोना मुळे सर्व लाँकडाऊन झाल्या मुळे सर्व फुल ईन्यजांय करणे कठीण झाले. आणि लग्नाची पत्रिका वाटून झाली. लाँकडाऊन आता काय कारायचं असा प्रश्न पडला होता.  डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती व्याहाड खुर्द यांनी माहिती दिली. या लाँकडाऊन असल्यामुळे आपण वाजा गाजा करता येणार नाही. कायदा हातात घेता येणार नाही. त्यानतंर व्याहाड खुर्द येथील रामभाऊ यादव मेश्राम यांचा मुलगा मुकंदा यानी रैयतवारी येथील किशोर कोसरे याची मुलगी कु.सोनाली सोबत दि 15/04/2020 ला रैयतवारी येथे नवरदेव कडील उध्दव मेश्राम, रामभाऊ मेश्राम, भाऊजी नवरदेव मुकंदा, तंटामुक्त सदस्य भास्कर म्हस्के,  नवरीकडील आई, वडील, बहिण भाऊजी, आणि भाऊ यांच्या उपस्थित डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती व्याहाड खुर्द यांच्या उपस्थित विवाह सोहळा पार पाडण्यात आला ना वरात ना गाजा वाजा  ना फटाके ना नाचना फक्त फुलांचे हार कपळाला बांशिग अशा साधा पध्दतीने विवाह संपन्न झाला डॉ षडाकांत कवठे हे सर्वाच्या सामाजिक कार्यामध्ये नेहमी सहकार्य करीत असतात.