Top News

पोभुर्णा तालुक्यातील नवेगाव (मोरे) येथे जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची प्रा. आ. केन्द्र सदिच्छा भेट.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा.
Bhairav Diwase.   April 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा: काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे .चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले,महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आज पोभुर्णा तालुक्यातील  नवेगाव (मोरे) येथे जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी  प्रा. आ. केंद्राला कोरोणा विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट दिली. आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी स्थानिक आरोग्यासंबंधी अनेक विषयांवर चर्चा करत स्थितीचा आढावा घेतला. 
याप्रसंगी, पं. स. सभापती अल्काताई आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवगडे, डॉ. शेख यांसह प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने