Top News

पोंभुर्णा पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा भगिनींना माॅस्क व सॅनिटयझरचे वितरण.

जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी पंचायत समितीत केले वाटप.
   Bhairav Diwase.   April 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात संचारबंदी लागू झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी अत्यावश्यक सुविधेसह सरकारी कार्यालये सुरू आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी नागरिकांची ये-जा असते. आणि आलेल्या अभ्यागत नागरिकांचा व अधिकारी कर्मचाऱ्यांचा जवळून संपर्क येतो. हे लक्षात घेऊन संसर्गावर खबरदारी परतण्यासाठी याठिकाणी सॅनिटायझर तसेच मास्कचा उपयोग व्हावा. हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी पोंभुर्णा पंचायत समितीला भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांसह तालुक्यातील ग्रामसेवकांकरीता सॅनिटयझर व मास्कचे वाटप केले.
तसेच ग्रामीण क्षेत्रात नागरिकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असणार्‍या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनाही स्वतःसह नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी परतण्यासाठी CDPO आणि TMO यांच्या माध्यमातुन माॅस्क व सॅनिटयझरचे वितरण यावेळी करण्यात आले.
   याप्रसंगी उपस्थितांमध्ये, पं. स. सभापती अल्का आत्राम, जि. प. सदस्य राहुल संतोषवार, पं. स. संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेलघेल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मामीडवार, भाजपा तालुकाध्यक्ष गजाननजी गोरंटीवार यांसह आदि मंडळी होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने