Top News

वाढदिवसाच्या दिवशी कु.अन्वितीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधिला मदत.

मनी बैंक मधील रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देवून सामाजिक बांधीलकी जोपासन्याचे काम चिमुकल्या कु. अन्वितिने केले.
Bhairav Diwase.   April 23, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सद्या देश कोरोना ग्रस्त विषाणुच्या संकटात सापडलेला आहे. त्या दृष्टीने मदत करण्यासाठी सर्वजन प्रयत्न करित असतांनाच आपलाही यात सहभाग असावा म्हणून आपल्या वाढदिवसाच्या निमित्याने वर्षभरात जमा झालेली मनी बैंक मधील रक्कम मुख्यमंत्री सहायता निधि ला देवून सामाजिक बांधीलकी जोपासन्याचे काम चिमुकल्या कु. अन्वितिने केले आहे.
वर्षभरात आपल्या मनी बैंक मधे जमा झालेली रक्कम दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्याने काढून नवीन वस्तु खरेदी  करणारी चंद्रपुर जिल्ह्यातील सावली येथील  कु.अन्विति सूरज बोम्मावार हिने यावर्षी मात्र कोणतीही वस्तु खरेदी न करता तिच्या मणि बैंक मधे जमा झालेले 2320 रुपये कु.अन्वितिने आज  23 ला तीच्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री सहायता निधित जमा केले आहे. सावली येथील तहसील कार्यलायात जावून तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्या मार्फत पाठवीले. कु.अन्विती या  चिमुकलीच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने