Top News

सावली येथील भाजपातर्फे कोरोनाग्रस्तांना प्रधानमंत्री फंडात १४,०००रु देऊन केले सहकार्य.

सावली तालुक्यातील भारतीय जनता पार्टीतर्फे १४,०००रु कोरोनाग्रस्त साठी मदत म्हणून प्रधानमंत्री मदत फंडात पैसे जमा करून मदत व सहकार्य.
 Bhairav Diwase.   April 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोना विषाणूने सर्व देशाला हादरवून सोडले असून या विषाणूला लढा देण्याकरिता महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत देण्याचे कार्य करीत आहे. आता शासनावर सुद्धा आर्थिक बोझ वाढत असल्याचे दिसून येत असल्याने या कठीण प्रसंगी कित्येक नागरिकांनी मदतीचा हात पुढे करून सरसावले आहेत. अशा मदतीकरिता सावली तालुक्यातील भारतीय जनता पार्टीतर्फे १४०००रु कोरोनाग्रस्त साठी मदत म्हणून प्रधानमंत्री मदत फंडात पैसे जमा करून मदत व सहकार्य करण्यात आले आहे. आपण सुद्धा जमेल तितकी रक्कम या कठीण प्रसंगी मदत करून सरकार सोबत खंबीरपणे उभे राहू असे मनात विचार करून सावली येथील भाजपा तर्फे १४००० रुपये  सहायता निधीमध्ये जमा करण्यात आले. 
   भाजपाचे तालुका महामंत्री तथा शहर अध्यक्ष सतीश बोम्मावार व नगराध्यक्ष चंद्रकांत संतोषवार यांनी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक उपक्रम राबवितांना दिसत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने