पोंभुर्णा पोलीसांचा कार्यवाही चा बडगा.
Bhairav Diwase. April 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देशात कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका असे सांगितले जात आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र लाॅकडाउन स्थिती आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा शहरातील जुना बस स्टैंड चाैकात पाेलिस प्रशासनाकडून शहरात बिना कामाने गाडीने फिरणारे, मास्क न लावून कामानिमित्त बाहेर येणार्यांना चांगलेच दम देण्यात आले. काेराेना लढ्यात पाेलिसांची चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे.