Top News

सावली तालुक्यातील व्याहाड बुजरूक येथे कोरोनाच्या लाँकडाऊन मध्ये साध्या पद्धतीने आटोपले लग्न.

अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा 
Bhairav Diwase.   April 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सावली तालुक्यातील व्याहाड बुजरूक येथील निलकंट गुरूनुले यांची मुलगी पुनम हिचे लग्न मुल तालुक्यातील टेकाडी येथील गोपाळाजी मोहुले याचा मुलगा  आशिष यांचे सोबत लग्न जुळले. पंरतु लाँकडाऊन असल्यामुळें लग्न करायचे की नाही काय करायंच अशी चिंता निर्माण झाली. पंरतु सुनील बोमणवार कोष्याध्यक्ष पत्रकार संघ सावली यांनी चिता करु नका. आणि दोन्ही कडील पार्टी ला बोलावून डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाडखुर्द याचेंशी सपंर्क सांधला. आणि सर्व शासनाच्या माहिती प्रमाणे आपल्या ला लग्न करावा लागेल ना वाजा ना गाझा.  आपल्याला अंतर ठेवून माँस बाधुन व पाच-पाच लोक कार्यक्रमात राहतील असे समजविण्यात त्यावर दोन्ही पार्टी तयार झाले. त्यानंतर आज दि 26/4/2020ला श्री निलकंट गुरनुले यांचे विवाह लावण्यात आले यामध्ये सुनील बोमणवार, सुभाष करणेवार, वंदना अनिल गुरूनुले माजी सरपंच विष्णु लोनबले मुलीचे मुलाचे आईवडील उपस्थित होते. डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाडखुर्द याचे उपस्थित विवाह पार पाडण्यात आले अगदीं साध्या पद्धतीने. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने