Top News

रक्तदान हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य:- सौ संध्या गुरनुले.

जि.प.सदस्यांनी अक्षय तृतीयेला साधला मुहूर्त.

स्वेच्छा रक्तदानाचा २५ वा दिवस.

आ सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.
Bhairav Diwase.    April 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर: कोरोनाच्या वैश्विक महामारी संकटाचा सामना करण्यासाठी जि प प्रशासन सज्ज आहे.आमचे  अधिकारी,डॉक्टर्स सेवा देत असताना शेकडो आशा वर्कर,अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून लढा देत आहेत.रक्तदान सुद्धा या लढ्याचा भाग आहे.जिल्हा परिषदचे लोकप्रतिनिधी पण शक्य तशी मदत जनतेला करीत आहेत.अनेकांनी रक्तदान केल्यावर आज जि प सदस्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे  कर्तव्य असल्याचे प्रतिपादन  जि प अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले.त्या आय.एम.ए सभागृहात ,आम सुधीर  मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे आज रविवार (२६ एप्रिल)ला आयोजित स्वेच्छा रक्तदान उपक्रमात बोलत होत्या.
    यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सभापती (कृषी)सुनील उरकुडे,जि.प.सभापती (बांधकाम-वित्त)राजू गायकवाड,जि प सदस्य रणजित सोयाम,प्रकल्प संयोजक डॉ मंगेश गुलवाडे,डॉ स्वप्नील चांदेकर, यांची उपस्थिती होती.
संध्या गुरनुले म्हणाल्या,आपल्या जिल्ह्यात कोरोना परसरला नाही हे आपले भाग्य आहे.सुधीरभाऊनी  वेळीच लक्ष देऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली.सॅनिटायझर असो की साबण,जेवणाचे डबे असो की अन्नधान्य वितरण मागेल त्याला दिले व देत आहेत.आम मुनगंटीवार आपल्या जिल्ह्याचे गौरव आहे.त्यांच्याच प्रेरणेने निरंतर २५व्या दिवशी रक्तदान होत आहे,त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोना चा लढा जिंकू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रास्ताविक व स्वागतपर संबोधनात डॉ गुलवाडे यांनी स्वेच्छा रक्तदानाचा आढावा घेत,अक्षय तृतीयेला दिलेल्या दानाचा क्षय होत नाही.चांगले दिवस आनंद देतात तर वाईट दिवस अनुभव देतात.असे सांगून सेवा करीत रहा,असे आवाहन केले.
     अक्षयय तृतीयेच्या या पावनपर्वावर जि.प सदस्य राहुल संतोषवार, हरीश गेडाम, मनोज तिवारी, मारोती गायकवाड आणि विशाल हुड यांनी रक्तदान केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.मयूर चहारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्वप्नील राजूरकर, राजेश ठेंगणे, सुरज गुरनुले, अमोल ढोक, निलेश बोमनवार, अक्षय बांधूरकर,अनुप श्रीकोंडावार, प्रज्वलन्त कडू, सुरज पेडुलवार यांची उपस्थिती होती.संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले तर, मयूर चहारे ने आभार मानले.अध्यक्ष संध्या  गुरनुले यांचे हस्ते रक्तदात्याना मास्क वितरित करण्यात आले. यशस्वितेसाठी दत्तप्रसंन्न महादाणी,प्रकाश धारणे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासंगोट्टूवार, रक्तसंकलन अधिकारी जयसिंग डोंगरे, पंकज मस्के,अक्षय डहाके परिश्रम घेत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने