Top News

जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेवतीने जि. प. सदस्यांना क्षेत्रात वाटपासाठी सॅनिटयझर वितरित.

स्थानिक पातळीवर वाटप करण्यासाठी सॅनिटयझरचे वितरण.
   Bhairav Diwase.    April 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी लागू केली गेली आहे. अशा परिस्थितीत खबरदारी परतण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना सॅनिटायझरचा उपयोग करावा. आणि त्यामाध्यमातुन सर्वांना आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून, जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी नागभिड तालुक्यातील पारडी- मिंडाळा- बाळापुर जि. प. क्षेत्राचे सदस्य संजयभाऊ गजपूरे तसेच वरोरा तालुक्यातील शेगाव-बोर्डा जि. प. क्षेत्राच्या सदस्या सौ. ज्योतीताई वाकडे यांना स्थानिक पातळीवर वाटप करण्यासाठी सॅनिटयझरचे वितरण केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने