Top News

पोंभुर्णा तालुक्यातील बँकांना कु अल्का आत्राम सभापती पं स पोंभुर्णा यांच्या कडुन मास्क व सॅनिटयझरचे वाटप.

बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटयझरचे वाटप.
     Bhairav Diwase.   April 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा:- काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आज पोंभुर्णा तालुक्यातील इंडियन बँक आणि सी डी सी सी बँकांना अल्का आञाम यांच्या कडुन मास्क व सॅनिटयझरचे वाटप करण्यात आले. सध्याकोरोणाच्या थैमानामुळे बँकेत लोकांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. बँकेतील अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. म्हणून त्यांना सुद्धा सुरक्षित राहणे आवश्यक आहे, म्हणून कु अल्का आत्राम सभापती पं स पोंभुर्णा यांचे कडुन मास्क आणि सॅनिटयझरचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने