Top News

पोंभुर्णा तालुक्यातील ग्राम पंचायत आष्टा कडून दिव्यांगांना किटचे वाटप.

हरिष ढवस सरपंच ग्रामपंचायत आष्टा, अनिल निखारे ग्रामसेवक, ग्रामपंचायत आष्टा यांचे हस्ते किटच वाटप.
    Bhairav Diwase.   April 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देश सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान  देत आहे. काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे . चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यातील ग्राम पंचायत आष्टा कडून दिव्यांगांना किटचे वाटप करण्यात आले, या किट मध्ये तांदूळ 1 किलो, तेल 1 किलो, डाळ 1 किलो, साखर 1 किलो, निरमा 1 किलो, डेटॉल साबून 1 पॅक, विठोबा मंजन, निरमा साबुन 2 नग, तिखट अर्धा किलो, लसूण अर्धा किलो, hand वॉश 1 नग, मीठ 1 किलो, सॅनिटायझर 1, पार ले बिस्कीट इत्यादी जीवनावश्यक वस्तू देण्यात आले. हरिष ढवस सरपंच ग्रामपंचायत आष्टा , अनिल निखारे ग्रामसेवक ग्रामपंचायत आष्टा यांचे हस्ते किटच वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने