Top News

पोंभूर्णा शहरातील शेकडो गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंरुपी मदत.

जंगल मारोती देवस्थान समिती कविटबोडी ता. पोंभूर्णा चा पुढाकार.
Bhairav Diwase.   April 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भुकेल्यांना अन्नदान करण्यासारखे पुण्य दुसऱ्या कशातही नसते.हीच विचारधारा डोक्यात उतरवून कुठल्याही प्रकारचा मतभेद, जातीभेद,राजकरण न करता जंगल मारोती देवस्थान समिती यांच्या कुशल धोरणामुळे भुकेल्यांच्या पोटात दोन घास गेले, ही भावना माणसाला स्वर्गाचा आनंद देऊन जाते. नेमका हाच आनंद पोंभूर्णा  येथील त्रस्त कुटुंबीयांनी अनुभवला आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या कुटुंबियांना पोंभूर्णा तालुक्यातील येथील जंगल मारोती देवस्थान समिती यांनी शहरातील शेकडो गरजू कुटुंबाना तेल, हळद, मीठ, मिरची पावडर, तेल तांदूळ, तूरदाळ, इत्यादीं जीवनास्वक वस्तूंचा पुरवठा उपलब्ध करून पोंभूर्णा शहरातील अनेक गोरगरीब गरजू कुटुंबातील सदस्य येथील कार्यकर्त्यांनी एक हात मदतीचा दिला असून सामन्यांमध्ये हर्षाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. वाढत्या संचारबंदी मुळे आपल्या कार्यकर्त्या सोबतीला घेऊन धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे आदर्श ठेवला.
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे हातावर पोट असणारे अनेक कामगार बेरोजगार झाल्यामुळे यासाठी शासनाच्यावतीने सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.अश्याप्रकारे आज जंगल मारोती देवस्थान समिती
यांनी शहरातील गरजू कुटुंबाना एक हात मदतीचा दिला असून या कुशल कार्याला पोंभूर्णा शहरात खूप मोठे उधाण आले असून गोरगरीब कुटुंबातील सदस्य हर्षाने डोलत असल्याचे चित्र सामन्यांमध्ये दिसून येत आहे.जंगल मारोती देवस्थान समितीच्या पुढाकारातुन कोरोना या आजारामुळे निर्माण झालेल्या भिषण संकटकाळी पोंभुर्णा शहरात गरजुंना  किट अन्नधान्यासह किराणा मालाचे वितरण प्रत्यक्ष परिवाराची चौकशी करून लोकांना वाटप करण्यात आलेले आहे. हे वाटप करत असताना असे लक्षात आले की या लॉकडाऊन च्या काळात अनेकांचा रोजगार थांबलेला आहे. काम थांबल्यामुळे त्यांच्याकडे येणारा आर्थिक ओघ संपूर्णपणे थांबलेला आहे. अनेक प्रकारच्या गरजा या लोकांच्या असल्या तरी वर्तमान स्थितीत जगण्यासाठीच्या साहित्याची त्यांना अत्यंत गरज आहे. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून आपण काही कुटुंबांना आपल्या वतीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण करीत असलेली मदत अत्यंत तोकडी असली तरी एक बंधुत्वाचा आधार देणारी निश्चितच आहे.हे समाधान सर्व सदसयांच्या चेहऱ्यावर झळकत होते. अजुनही आपल्या मदतीची गरज असलेली अनेक कुटूंबे आहेत अजून मदत करण्याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी मित्रांनी पुढे येण्याची गरज असल्याचं वास्तव पुढं आलं आणि अशा प्रकारे समाजातील आर्थिक संपन्न लोक मदतीकरिता अनेकांनी पुढे यावे असे आवाहन जंगल मारोती देवस्थान समितीकडुन करण्यात आले. यात जंगल मारोती देवस्थान समितीचे अध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरिवर अरुण यामावार,अमर बघेल, राकेश नैताम, आनंदराव पातडे,नंदुकीशोर बुरांडे, रामदास गव्हारे,व ईतर सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने