जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचेकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप.

Bhairav Diwase
जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचे कडून सकाळी घरी आलेल्या गरजू बांधवांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
   Bhairav Diwase. April 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
 मुल: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात घोषित करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळच्या अन्नासाठी मोठा प्रश्न भेडसावत आहे.
     अशा परिस्थितीत आज मंगळवार, दि. १४ एप्रिल. मुल शहरातील काही गरजू बांधव आज सकाळी जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचे स्वगृही मदत व्हावी या अपेक्षेने आले. आणि नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी अग्रणी असणार्‍या सौ. संध्याताईंनी घरी आलेल्या त्या बांधवांना अन्नधान्याचे वाटप केले.
तसेच स्वतःसह कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि अनावश्यक कारणाने घराबाहेर पडणे टाळा. अशी सूचनाही त्यांनी आलेल्या त्या बांधवांना याप्रसंगी केली.