वरोरा येथील 'शर्मा पान मटेरियल' यांचे गोडाउनवर छापा.
Bhairav Diwase. April 30, 2020
वरोरा: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर 'शर्मा पान मटेरियल' यांचे गोडाउनवर छापा टाकून महत्त्वपूर्ण कारवाई करीत वरोरा पोलिसांनी दोन लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
वरोरा येथील 'शर्मा पान मटेरियल' यांचे गोडाउनमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा अवैध साठा आहे. याबाबतची माहिती वरोरा पोलिसांना मिळताच त्यांनी वरोरा येथील स्थानिक विठ्ठल मंदिर वार्डातील विजय शर्मा यांच्या घरसदृश गोडाऊनमध्ये छापा टाकला असता पथकास २ लाख ८ हजार ८२८ तंबाखू संबंधित मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.