Click Here...👇👇👇

पाेंभूर्णा तालुक्यात १६८ हाेम काेरेंन्टाईन ; प्रशासनाची करडी नजर

Bhairav Diwase
तहसिलदाराचे नागरिकांना आवाहन


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभूर्णा: काेराेना वायरसने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे .राज्यात कोरोना ग्रस्ताची संख्या १८० वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे .
पाेंभूर्णा तालुक्यात १६८ जणांना हाेम काेराेनटाईन करण्यात आले आहे. हाेम काेरनटाईचे सिक्के मारून त्यांचेवर प्रशासना कडून करडी नजर ठेवली जात आहे. हाेम काेराेनटाईन केलेल्यांच्या घरा समाेर पत्रक लावण्यात आले आहेत. त्यावर संबंधित माहिती लिहलेली असून त्यावर नियंत्रण कक्षाचा नंबर लिहण्यात आला आहे. हाेम काेराेनटाईन करण्यात आलेले बाहेर फिरतांना दिसल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाला माहिती देण्यासाठी अपीलही करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान यांंनी संपूर्ण देशभर १४ एप्रिल पर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत . कोरोना निर्मूलना करिता सर्व नागरिकाने संचारबंदी चे काटेकोरपणे पालन करणे व आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडावे असे आवाहन तहसीलदार डॉक्टर निलेश यांनी केले आहे. कोरोना पार्श्वभूमी वर पाेंभूर्णा शहरात व तालुक्यातील गाव खेड्यात निर्जंतुक फवारणी केल्या जात आहे. स्वच्छतेवरही भर दिल्या जात आहे . गावा गावातील सरपंचांनी काेराेनाला हद्दपार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असून तालुका प्रशासना कडून माेठी खबरदारी घेतली जात आहे.