Click Here...👇👇👇

सरपंच, उपसरपंच, सदस्य/सदस्या, ग्रामसेवक आणि गावकरी कडून ""एक हात मदतीचा उपक्रम"

Bhairav Diwase
आष्टा येथील ग्रामस्थांकडुन गरजू लोकांना मदतीचा हात
Bhairav Diwase.  April 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू पाश्र्वभूमीवर केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका असे सांगितले जात आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. कोरोना व्हायरस मुळे  सर्वत्र लाॅकडाउन स्थिती आहे. पण पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा गावातील नागरिकांनी गरजू  लोकांसाठी कोरोना लॉक डाऊनच्य काळात गरजू लोकांना अन्न धान्याची सोय व्हावी यासाठी १ छोटीशी मदत करण्यासाठी पुढे आले आहे.सरपंच, उपसरपंच, सदस्य/सदस्या, ग्रामसेवक आणि गावकरी कडून ""एक हात मदतीचा उपक्रम"" राबविण्यात आला.  २.१० क्विंटल तांदूळ गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा SDO साहेब आणि मा  तहसीलदार साहेबांना देण्यात आले.