Click Here...👇👇👇

CoronaVirus: राज्यात कोरोनाचे १४५ नवे रुग्ण, आकडा ६३५वर!

Bhairav Diwase
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांत वाढ
Bhairav Diwase    April 05, 2020
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
महाराष्ट्र: ‌राज्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यात कोरोनाचे १४५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६३५वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५२ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले असून त्यांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ३७७वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या राज्यात भीतीचे वातावरण पसरत आहे. आज राज्यात ६ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी १ रुग्ण मुंब्रा ठाणे येथील तर १ रुग्ण अमरावती येथील आहे. उर्वरित ४ रुग्ण मुंबई येथील आहेत.