Click Here...👇👇👇

नेहमीच मदतीचा हात देणारे मा आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार

Bhairav Diwase
मा आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कुमारी अल्काताई आञाम आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पञके आणि सँनिटर वाटप करुन कोरोणा विषाणू बाबत जनजागृती
Bhairav Diwase.   April 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभूर्णा : काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे .राज्यात कोरोना ग्रस्ताची संख्या ३०२ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पोभुर्णा तालुक्यात कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुर, काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली. तेव्हा नेहमीच मदतीचा हात देणारे मा आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ७० ते ८० लोकांना (तांदूळ, गहु, दाळ, तेल, तिखट, मीठ, हळद, साखर, पत्ती, हात धुण्यासाठी साबुन, निरमा, इ. )साहित्य असलेली किट लालहेटी, बोर्डाबोरकर, चेक नवेगाव, घाटकुळ, येथे अडकुन पडलेल्या मजुरांना मा देवरावभाऊ भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, गजानन गोरंटीवार भाजपा तालुकाध्यक्ष पोंभुर्णा, अल्काताई आञाम सभापती पंचायत समिती पोभुर्णा, विनोद देशमुख सदस्य पंचायत समिती पोभुर्णा, गंगाधर मडावी सदस्य पंचायत समिती पोभुर्णा, यांनी वाटप केले. पोंभुर्णा तालुक्यातील गावागावात मा सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कुमारी अल्काताई आञाम आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पञके आणि सँनिटर वाटप करुन कोरोणा विषाणू बाबत जनजागृती करण्यात आली.