लोकनेते मा.आ.श्री सुधीभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे पोंभुर्णा शहरातील दुकानांसह ठिकठिकाणी सॕनिटयझरचे वाटप करण्यात आले.

Bhairav Diwase
लोकनेते मा.आ.श्री सुधीभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे पोंभुर्णा शहरातील दुकानांसह ठिकठिकाणी सॕनिटयझरचे वाटप करण्यात आले.
 Bhairav Diwase    April 04,2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोणाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून मा. पंतप्रधानानी संपूर्ण भारतात lockdown ची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या दुकानांत नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे अशा ठिकाणी सॅनिटयझरचा उपयोग व्हावा या उद्देशातून आ.सुधीर मुगनंटीवार यांच्या कडून पोंभुर्णा  शहरातील  किराणा दुकाना,तहसील कार्यालय,पोलिस सटेशन,प्राथमीक आरोग्य केंद्र,नगर पंचायत,राशन दुकान,बँका,खाजगी दुकान व आदी जीवनावशक वस्तूच्या सार्वजनीक ठिकाणी नागरिकांना सॅनिटयझरचे वाटप भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार,नगराध्यक्ष श्वेता वनकर,उपनगराध्य रजिया कुरेशी,ईश्वर नैताम,अजित मंगळगिरिवार,मोहन चलाख,सुनिता मॅकलवार,नेहा बघेल,पुष्पा बरांडे,किशोर कावडे,विजय कस्तुरे शरदा कोडापे कल्पना गुरुनूले राजु ठाकरे यांच्या उपस्थित वाटप करण्यत आले.