Click Here...👇👇👇

CDCC Bank: CDCC बॅंकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज, २२ जुलै रोजी पार पडली असून, यात भाजप समर्थित उमेदवारांनी बाजी मारली आहे.



चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, २१ संचालक असलेल्या या बँकेत, रवींद्र शिंदे आणि संजय डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.


या निवडीप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आणि आमदार करण देवतळे यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.