सोशल डिस्टन्सिंग (सुरक्षित अंतर) नियम पाळत महामानवाला अभिवादन.
Bhairav Diwase. April 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे साखरी, सावली
सावली: देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून ३० एप्रिलपर्यंत लाँकडाउन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अधिसूचनाचा अवलम्ब करून यावर्षी १४ एप्रिल विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करता येणार नसल्याने जनतेच्या सुरक्षिततेचा आणि शासनाच्या सुचना व नियमांचे पालन करत सावली शहरात सोशल डिस्टन्सिंग (सुरक्षित अंतर) ठेवत रमाबाई आंबेडकर विद्यालयातील तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंचित बहुजन आघाडी कडून अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष रोशन बोरकर यांनी सरकारने लागू केलेल्या १४४ कायद्याचे पालन करित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्प अर्पण केले. यावेळी त्यानी जनतेला नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा. जर तुमच्या कडे दोन पैसे असतील तर एका पैशाची पोटासाठी भाकर घ्या आणि दुसऱ्या पैशाची ज्ञानाकरिता पुस्तक घ्या, भाकर तुम्हाला जगविल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल आणि प्रत्येक अनुयायांचे हित जोपासत सुरक्षित अंतर ठेवून महामानवाला अभिवादन करावे असा संदेश दिला. यावेळी प्रशांत निमगडे, आकाश खोब्रागडे, अमोल दुधे, उपस्थितीत होते.