सावली तालुक्यातील रयतवारी येथे विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने मुलाचा म्रूत्य तर वडील गंभीर जखमी.

Bhairav Diwase
रयतवारी येथे विद्युत स्पर्शामुळे एका शेतकरी मुलाचा मृत्यु तर वडील जखमी
     Bhairav Diwase.   April 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे साखरी, सावली
सावली: सावली तालुक्यातील रयतवारी येथे विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने मुलाचा म्रूत्य तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना आज रोजी दुपारच्या सुमारास घडली. सावली  तालुक्यातील रैयतवारी येथील शेतकरी सुनील फाले (25) व त्याचे वडील टमाटर च्या शेतीला पाणी पुरविण्याकरीता गेले होते.  सुनील हा नेहमी प्रमाणे मोटर पंप चालू करण्याकरिता गेला असता विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने म्रूत्य झाला.  मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील सुध्दा गंभीर जखमी झाला.  शेतीला पाणी करण्याकरिता गेलेल्या बाप-लेक यांना विद्युत स्पर्श लागल्यामुळे मुलाचा मृत्यु तर वडील जखमी झाला. जखमी ला गडचिरोली येथील दवाखान्यात भरती आले आहे. सदर घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली.  तरुण मुलाचा म्रूत्य झाल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. सदर चौकशी व पंचनामा सहायक पोलीस निरीक्षक मस्के, बोलीवार, रूपेश, वाटे एरिया लाइनमैन यांच्या उपस्थित पुढील तपास चालू आहे.