संचारबंदीमध्ये अडकलेल्या नागरिकांना समाजसेविका. वैष्णवी मालविय, अनपूर्णा मालविय याच्या मदतीने तांदुळ वाटप.

Bhairav Diwase
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा जुनी वस्ती मध्ये समाजसेविका वैष्णवी मालविय, अन्नपूर्णा मालवीय यांच्या मदतीने तांदुळ वाटप करण्यात आले.
Bhairav Diwase.    April 14, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
 जगात कोरोना या महाभयंकर विषाणू ने  थैमान घातले असून देशावर महामारी चे संकट  येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन,  संचार बंदी तसेच  संपूर्ण महाराष्ट्रात राज्य व जिल्हा बंदी करण्यात आली आहे. तरी देखील महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना  विषाणूंचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. 
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. त्यामुळे काही लोक अडचणी आहे. काम करून पोट भरण्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या कडे उपासमारीची वेळ आली. अमरावती जिल्ह्यातील राहुल नगर, बडनेरा जुनी वस्ती मध्ये, संचारबंदी मध्ये अडकलेल्या नागरिकांना, काही कुटुंब संचारबंदी लागु झाल्यापासुन कामाला जाने बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्या असता. समाजसेविका वैष्णवी मालविय, अन्नपूर्णा मालवीय यांच्या मदतीने तांदुळ वाटप करण्यात आले.