विदर्भातील या मंदिरात होतेय भाविकांच्या अनुपस्थितीत महाकालीची आरती.

Bhairav Diwase
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली या मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा सुरू.
    Bhairav Diwase.    April 15, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली कोरानामुळे सध्या मंदिर बंद आहे. भाविकांची वर्दळ थांबली आहे. लॉकडाऊनमुळे यात्राही रद्द करण्यात आली आहे. मात्र, या मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा सुरू आहे. सकाळी आणि सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या आरतीला रोज शेकडो भाविक हजर असायचे. आता केवळ पुजारी गजानन चन्ने आणि विश्‍वस्त सुनील महाकाले यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित असतात. केवळ भाविकांची गर्दी कमी झाली आहे. मात्र, मातेची पूजाअर्चा नित्यनेमाने सुरू आहे. शेकडो वर्षांत प्रथमच भाविकांशिवाय आरती करण्याची वेळ आली आहे. परंतु, परिस्थितीच तशी ओढवली आहे. मंदिर आणि परिसरातील गजबज थांबली आहे.
यात्रा रद्द
दरवर्षी चैत्र नवरात्रात महाकालीची यात्रा भरत असते. या काळात हा सारा परिसर गजबजलेला असतो. या यात्रेला 80 वर्षांची परंपरा आहे. आजवर ती कधीच खंडित झाली नाही. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे प्रथमच या यात्रेत खंड पडला.