Top News

सावली येथे विलागिकरण केलेल्या ८० मजुरांना म.ग्रामीण पत्रकार संघातर्फे भोजनाची व्यवस्था.

ग्रामीण पत्रकार संघ तालुका सावली संघाचे सर्वत्र कौतुक.
Bhairav Diwase.   April 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सरकारने अनेक उपाय योजना केल्या आणि त्याचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन,संचारबंदी केली.त्यामुळे बाहेर राज्यात मजुरीला जाणारे मजूर जिथले तिथेच अडकले.मागील एक ते दीड महिन्यापासून असलेल्या मजुरांना आता घराची ओढ लागल्यामुळे त्यांनी स्वतःच्या घराकडे येण्याची पायदळ व मिळेल त्या सोयीने निघाले पण राज्य,जिल्हे सिमा बंद असल्याने पुढे जाता येत नाही अशा अडकलेल्या व अलगीकरणात असलेल्या ८० मजुरांची  सामाजिक बांधिलकी जोपासत सावली येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघतर्फे अध्यक्ष अनिल स्वामी यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष सतीश बोमावार यांचे नेत्रुत्वात सचिव लखन मेश्राम व सर्व सदस्य यांनी एक वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली.  यात मराठी पत्रकार संघाचे उदय गडकरी, चंद्रकांत गेडाम व नगरसेवक चंद्रकांत संतोषवार,देवा बावणे यानीही सहकार्य केले. ग्रामीण पत्रकार संघ तालुका सावली हे प्रशासनाला व जनतेला सहकार्य करण्याकरीता अनेक उपक्रम तालुक्यात राबवितांना दिसत आहेत त्यामुळे या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यावेळी आशिष दुधे प्रशिद्धि प्रमुख, विजय कोरेवार, शीतल पवार, आशीष पुण्यपवार, राकेश एम गोलेपल्लीवार ,दिलीप फुलबांदे, सुजीत भसारकर, सुधाकर दुधे, अनिल गुरुनुले रवी कुडकवार प्रविन गेडाम, सुनील देहलकार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने