अवैध्य रेती माफियाचे धाबे दणानले.
Bhairav Diwase. May 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सावली तालुक्यात बाहेर राज्यात मिरची तोडनी करीता गेलेल्या मजुरांनी मागील तिन चार दिवसापासून आपल्या स्वगावी आलेले आहेत. सावली च्या तहसीलदार पुष्पलता कुमरे ह्या कोरोना च्या प्रादुर्भाव मुळे तेलंगनात अडकलेले अनेक मजूर गावात आल्याने अनेक ठिकाणी शाळेत ठेवत आहे. त्यांची पाहणी करण्यासाठी सर्वत्र भेटी घेत असतानाच, सावली तालुक्यातील कापसी येथे गेले असता, वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती अघाट सुरु असल्याची माहिती दिली. त्या वरुण कापसी गावामधे अनेक जण स्वतःचा घरी, शेतात, रिकाम्या जागेत शेकडो ब्रास अवैध रित्या रेती साठवून ठेवेले अशी माहिती देण्यात आली त्या वरुण आज तहसीदार कुमरे या स्वतहा प्रत्येक ठिकाणी जावुन पाहणी केली असता जवळपास 300 हुन अधिक ब्रास ची रेती ही जमा करुण ठेवली असल्याचे दिसले . त्यामुळे या सर्व रेति साठवनुक करुण ठेवलेल्या सर्वावर उद्या कारवाई करण्यात येणार आहे . त्यात सर्वावर गुन्हा दाखल करणार की दंड वसूल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या माफियानव कोणती कार्यवाही करणार यांचेकडे तालुक्यातील सर्वाचे लक्ष लागले आहे.