पोंभुर्णा तालुक्यातील केमारा गावातील सर्व युवकांनी स्व खर्चातुन 37 मजुरांची केली सोय.

Bhairav Diwase
सर्व गावातील युवकांनी केमारा गावातील युवकांचा आदर्श घेऊन पुढाकार घ्यावा:- केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार.

जनसामान्यांच्या हितासाठी, जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी केमारा गावात आलेल्या मजुरांना व गावातील युवकांना दिली भेट.
     Bhairav Diwase.  May 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा:- काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथील व्यक्ती आंध्रप्रदेश मध्ये मिरची तोडण्यासाठी गेले होते. पण लाॅकडाउन मुळे ते तिथेच अडकून पडले होते. बाहेर राज्यात गेलेल्या मजुरांना स्वगावी आणण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर केमारा गावातील 37 मजूरांना स्वगावी आणले. पण 14 दिवस क्वारंटाईन करुन ठेवले जाते. त्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यातील केमारा गावातील युवकांनी आणि ग्रामपंचायत यांनी  मजुरांना गावातील शाळेमध्ये सोय केली आहे. गावातील सर्व युवकांनी स्व खर्चातुन त्या मजुरांना नास्ताची, चाय, जेवणाची सोय करत आहे. 
              केमारा गावातील युवकांनी बाहेर गावच्या व्यक्तींना गावात प्रवेश देत नाही आहे. आणि गावात येणाऱ्या प्रवेशद्वारावर युवक उभे राहून आपले कर्तव्य चोख पणे पार पडत आहे. जनसामान्यांच्या हितासाठी, जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी केमारा गावात आलेल्या मजुरांना व गावातील युवकांना भेट दिली. आणि त्यांनी मजुरांना मास्क, सॅनिटयझर, बिस्किटच वाटप केले. व गावातील युवकांना मास्क आणि नास्ताची सोय केली. सर्व गावातील युवकांनी केमारा गावातील युवकांचा आदर्श घेऊन पुढाकार घ्यावा. असे आव्हान केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी केले.