ब्रेकिंग च्या नादात कोरोना वादात.
Bhairav Diwase. May 07, 2020
चंद्रपूर:- संपूर्ण देशात कोरोणा चे सावट असताना राज्यात सुद्धा कोरोणा चे अनेक रुग्ण सापडले आहे.अशे असताना चंद्रपूर जिल्ह्यात अखेर दीड महिन्यानंतर एक कोरोना चा रुग्ण सापडला असताना संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे .परंतु पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या नियोजनबध्द उपयोजनानामुळे कोरोंना चा प्रसार जिल्ह्यात होऊ शकला नाही.
परंतु नांदेड वरून ४ कोरोणा चे रुग्ण पळून त्यातील गडचांदुर येथे ३ संशयित व्यक्तींना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले परंतु ते ३ व्यक्ती कोरोना पाॅसीटीव असल्याचे काही सोशल मीडिया मध्यम (पोर्टल) ने बातम्या प्रकाशित केल्या परंतु काही वेळातच पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी ते ३ व्यक्ती अद्याप पाॅसिटीव नसून संशयित आहे त्यांना नांदेड पोलिसांची टीम येऊन नांदेड ला घेऊन रवाना झाली असल्याची स्पष्ट केले त्यामुळे अनेक पोर्टल वर ब्रेकिंग च्या नादात चुकीच्या बातम्या प्रकाशित केल्या जात आहे.अश्या चुकीच्या बातम्यांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अश्या बातम्यांमुळे ब्रेकिंग च्या नादात कोरोना वादात म्हणायची वेळ आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
गडचांदूर येथून पोलिसांनी नांदेड येथील 3 नागरिकांना ताब्यात घेतले असून या नागरिकांना अद्याप कोरोना झाला हे कळाले नाही . त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जनतेमध्ये संधम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहिती खात्री झाल्याशिवाय सोशल मिडीयावर प्रसारीत करु:- आधार न्युज नेटवर्क जिल्हा चंद्रपूर