अवैध दारू विक्री त्या विरुद्ध सावली पोलीस स्टेशन गाठून सरपंच व दारूबंदी समितीच्या अध्यक्षांनी लेखी तक्रार.
Bhairav Diwase. May 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावलीसावली:- दारूबंदी करिता श्रमिक एल्गार संघटनेच्या संस्थापिका,पारोमिता ताई गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी करिता थेट नागपूर च्या विधानसभेवर चंद्रपूर जिल्हात दारूबंदी च्या मागणी करिता लाखोंच्या संख्येने पायदळ मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधले. जैसा बोले तैसा चाले,त्याची वंदावी पावले, या मनी प्रमाणे करून निवडणूक पूर्व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत करत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली.
सावली तालुक्यात अवैद्य दारूचा महापूर असून याबाबत विद्यमान पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला अवैद्य दारू विक्रीवर आळा घालण्याकरीता निवेदन दिले होते. यावरून अवैद्य दारू विक्री जोमात असून पोलीस प्रशासन कोमात असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळत असून, अवैद्य दारू विक्रेत्यांना नेमके पाठबळ कोणाचें हे कळेनासे झाले आहे. त्यामुळे अवैद्य दारू विक्रेते थेट दारूबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सरपंचाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत मजल जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की सावली तालुक्यातील मौजा कोंडेखल गावातील अवैद्य दारू विक्रेत्यांनी जमाबंदी च्या काळात मोह फुलाची दारू विक्री करून गावात शांतता सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केल्याबाबत अवैध दारू विक्री त्यांबाबत गावातील नागरिकात रोष निर्माण झाला. त्यामुळे दिनांक 05/05/ 2020 ला तुम्ही आमची दारू बंद केले. मात्र खरेदी विक्री जोमात सुरू आहे. हे तुम्हाला दिसत नाही का असे असा वाद गावातील दारू विक्रेते मारोती उरकुडे यांनी दारूबंदी समितीचे अध्यक्ष अरविंद शेंडे यांना शिवीगाळ केले असता त्यांनी गावचे सरपंच ईश्वर ठुणेकर यांना पाचारण केले असता. दारू विक्रेत्यांनी त्यांनासुद्धा शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली व तुम्हाला दारूबंदी समिती गठीत करण्याचा अधिकार कोणी दिला? असा वाद घातला व यापूर्वीसुद्धा सदरहू दारूविक्री त्याने दारूबंदी महिला समित्यांना सुद्धा महाराणा शिवीगाळ केली. याबाबत त्याच्यावर न्यायालयीन वाद विद्यालय सुरू असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तेव्हा सदर दारू विक्रेत्याला नेमके अभय कुणाचे हे कळेनासे झाले आहे. अवैध दारू विक्री त्या विरुद्ध सावली पोलीस स्टेशन गाठून सरपंच व दारूबंदी समितीच्या अध्यक्षांनी लेखी तक्रार दिल्यावरून अवैद्य दारू विक्री त्याविरुद्ध भादवि कलम 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंद झाला. असून सदर प्रकरणाची चौकशी सावली पोलीस करीत आहे, गावकऱ्यांकडून सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.